श्रवण
शिक्षकांनी श्रवणपूर्व तयारी करीत असताना खालील सूचनांप्रमाणे
विदयार्थ्यांकडून खालील सूचनांप्रमाणे कृती करून घ्यावयाच्या आहेत.काही ठिकाणी स्वत:
कृती करून दाखवाव्या लागतील.
हालचालींची भाषा-हसणे,रडणे,रांगणे,ये जा करणे,उडया मारणे.
खुणेची भाषा-ये जा,बस,नाही
म्हणणे,हो म्हणणे.
हावभावाची भाषा-हसणे,लाजणे,गप्प
बस,रागावणे.
अभिनयाची भाषा-(कृती करून)
केस विंचर,फळा पूस,गाडी चालव.
बोलीभाषा-शिक्षकांनी
विदयार्थ्याची बोलीभाषा अवगत करून घ्यावी.व सरावाने बोलीभाषेकडून प्रमाणभाषेकडे जावे.तसेच
घरघुती भाषेतून चर्चा करावी.(गप्पा मारणे इ.)
ध्वनी
भाषा-विविध ध्वनी समजणे उदा.पक्षी,प्राणी,वस्तू,गाडी,वादय,उहुँ,च्यँक
च्यँक,शू......
ध्वनीभेद-डब्यात खडे,नाणी,घंटा,पैंजण
यांचा परीचय व आवाजातील फरक विदयार्थ्यांनी समजून घेण्यास त्यांना मदत करणे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा