शिक्षणक्षेत्रातील एक तंत्रज्ञानविषयक पाउल.....................

प्रकल्प

 
प्रकल्पाचा उददे विदयार्थ्यांना परिसरातील संदर्भ हाताळून शोधक वृत्तीने प्रश्‍न सोडविता (Discovery Method) आले पाहिजे.म्हणजेच विदयार्थ्यास

    संदर्भ जमा करणे (Data Collection)
    संदर्भाचे विश्‍लेषण करणे (Data Analysis)
    विश्‍लेषित माहितीचा अर्थ लावणे (Data Interpretation)


या बाबींची जाणीव व्हावी.या जाणिवेसाठी कोणत्याही विषयाचा वर्षभरात स्वत केलेला ( पालकांनी बाजारातील साहित्‍य वापरून तयार केलेला नको ) किमान एक प्रकल्प करणे ही अपेक्षा आहे.हे नियोजनही वर्गाला शिकवणा&या सर्व शिक्षकांनी परस्पर समन्वयातून करावे.विदयार्थ्यास प्रकल्प विषय निवडीचे स्वातंत्र दयावे.गुणदान करताना]प्रकल्प करताना प्रत्येक टप्प्यावरील एकंदरीत कामगिरीचा सारासार विचार करून गुणदान दयावे.हे स्वातंत्र शिक्षकास आहे.विदयार्थ्याने ज्या विषयाचा प्रकल्प केला आहे त्याच विषयासाठी गुणदान करावे.

पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी

इयत्ता पहिली ते आठवीसाठी विषयनिहाय प्रकल्पांची यादी -
भाषा -:
* परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.  
* पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.
* बडबडगीते तोंडपाठ करणे.
* चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.
* चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.
* उपयोगी  परिसरातील प्राणी चित्रे व उपयोग .
* परिसरातील विविध स्थळांची माहिती .
* वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन .
* कथा व कवितांचा संग्रह करणे .
* सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नामफलकावरील सुचनांचा संग्रह .
* वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.
* नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.
* निवडक उतार्यांचा संग्रह करणे .
* भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे .
* स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो जमविणे.
* शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमवा.
* गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. शेतकरी ,दुकानदार , सरपंच , ग्रामसेवक , तलाठी ,शिक्षिका .
* देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.
* विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.
* विविध पत्राचे नमुने जमा करणे.
* अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे .
* पाऊस विषयावरील कविता / चित्रांचा संग्रह करणे.
* शेतीबद्दलच्या गाण्यांचा संग्रह करणे.
*  पाळीव प्राणी  व त्यांचे उपयोग तक्ता /चित्रसंग्रह.
* तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवा.
* आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.
* आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा संग्रह करा.
* वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.
गणित -:
* नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.
* पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव
* दुकानास भेट देऊन व्यवहार करणे .
* आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.
* बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे .
* विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.
* व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे.
सामान्य विज्ञान -:
* परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे -चित्रे जमविणे.
* परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव.
* आपले शरीर -संबंधित चित्रे व अवयवांचे उपयोग .
* चांगल्या सवयींची यादी -अंगीकार
* पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी.
* प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग ( चित्रासह )
* ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य .
* वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य .
* बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण .
* परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग .
* उपयुक्त प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह व उपयोग .
* मातीचे प्रकार व नमुने संग्रह ,
* घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी.
* शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करा.
* पारंपारिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोतांची माहिती .
* शास्त्रज्ञांची नावे व लावलेले शोध तक्ता .
* वीस अन्नपदार्थांची यादी करा.त्यांचे चव व अवस्था नोंदवा.
* पदार्थाची स्थायू ,द्रव ,वायू गटात विभागणी .
* गावातील पाणीपुरवठा केंद्राला भेट देऊन माहिती गोळा करा.
* पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांची चित्रे जमवा.
* हवा प्रदुषण व पाणी प्रदुषण याविषयी माहिती संकलित करा.
* शेतीच्या औजारांची माहिती व उपयोग यांची माहिती संकलित करा.
इतिहास व ना.शास्त्र  -:
दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे .
* ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे .
* संतांची चित्रे व माहिती .
* शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह .
* विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह .
* अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा.
* शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .
* जहाजांची चित्रे जमवा.
* गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.
* देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.
* हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.
* समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.
भूगोल -:
* आपल्या परिसरातील विविध भूरुपांची माहिती .
* ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता .
* परिसर भेट - नदी ,कारखाना .
* गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती .
* परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.
* शेतीस भेट व कामाचे निरीक्षण .
* गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे .
* खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे .
* विविध धान्यांचे नमुने जमवा.
* परिसरातील प्रदुषणाची कारणे - यादी करा.
* गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी करा.
* विविध देशांचे नकाशे संग्रहीत करा.
*******************************************************************************************शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प
प्रकल्प म्हणजे काय ?
विद्यार्थ्याने शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलनशक्ती, स्वतःभोवतालचा परिसर त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.
प्रकल्पाची उद्दिष्टे
1. स्वयंअध्ययनाची सवय लावणे.
2. स्वकुवतीनुसार अध्ययनाची संधी मिळवणे.
3. स्वतःमध्ये उपजतच असणा-या निरीक्षण, निवेदन, संकलन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे.
4. तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे.
5. कल्पकता, सृजनशीलता, संग्रहवृत्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वयंशिस्त, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, संघभावना इत्यादी गुणांचा विकास घडवणे.
6. आत्मविश्वास प्राप्त करणे.
7. या व्यतिरिक्त निवडलेल्या विषयाची खास वैशिष्ट्ये अभ्यासणे. उदा.- भाषा विषयउच्चतम शुद्धता, पाठांतर क्षमता, विचार मांडण्याची क्षमता इत्यादी. प्रकल्पकार्य लेखन कसे कराल? प्रकल्पकार्य करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच केलेल्या प्रकल्पकार्याचे सुयोग्य प्रकारे लेखन करणेही महत्त्वाचे आहे, कारण निवेदन, सादरीकरण आदी क्षमतांचा विकास घडवणे आणि तर्कसंगत विचार करून अनुमान मांडणे ही प्रकल्पाची उद्दिष्टे तुमच्या प्रकल्पकार्य लेखनातून मूर्त स्वरूप घेणार आहेत. प्रकल्पकार्य लेखन कसे करावे, याचे मुद्देसूद मार्गदर्शन पुढे दिलेले आहे
( विद्यार्थ्यांसाठी )
1. प्रकल्पाचे नाव (विषयासह) – निवडलेल्या अभ्यासक्रमातील विषयाचे नाव प्रथम लिहा. नंतर त्या विषयातील निवड केलेल्या प्रकल्पाचे नाव लिहा.
2. प्रकल्पाचा प्रकारनिवड केलेला प्रकल्प पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे, त्याचा उल्लेख करासर्वेक्षणात्मक प्रकल्प, संग्रहात्मक प्रकल्प, संकलनात्मक प्रकल्प, रचनात्मक प्रकल्प, तक्त्यांच्या निर्मितीचा प्रकल्प, प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प.
3. प्रकल्पाची उद्दिष्टेनिवड केलेल्या प्रकल्पाची सुयोग्य उद्दिष्टे लिहा.
4. प्रकल्पाचे साहित्यविषयासंबंधित पाठ्यपुस्तक, लेखनसाहित्य, उपयुक्त साधने यांचा उल्लेख करा.
5. प्रकल्पाची कार्यपद्धतीप्रकल्प साकारत असताना करण्यात येणा-या कृतींचा उल्लेख क्रमवार पद्धतीने करा.
6. प्रकल्पाचे निवेदनयामध्ये निवड केलेल्या प्रकल्प करण्यामागचा हेतू अधिक स्पष्ट करून मांडा.
7. प्रकल्पाचे सादरीकरणसंकलित केलेल्या माहितीची योग्य प्रकारे मांडणी करा. संकलन करतेवेळी आलेल्या विशेष अनुभवांची नोंद करा. तसेच त्यावेळी मिळालेल्या सहकार्याचा, मदतकार्याचाही उल्लेख करा. घेतलेल्या संदर्भसाहित्याची नोंद करा.
8. आकृत्या चित्रांकनासाठीयेथे प्रकल्पाशी संबंधित चित्रे, आकृत्या, नकाशे चिकटवा आणि योग्य प्रकारे सुशोभन करा.
( शिक्षकांसाठी )
9. प्रकल्पपुर्तीसाठी वेळोवेळी केलेल्या विशेष बाबींची नोंदयामध्ये निवड केलेल्या प्रकल्पाबाबतीतील वैशिष्ट्यपूर्ण बाबींची नोंद करा.
10. मूल्यमापनयामध्ये केलेल्या प्रकल्पाची कोणकोणती उद्दिष्टे साध्य झाली? कोणते ज्ञान प्राप्त झाले? प्रकल्पासंबंधीचे स्वतःचे मत किंवा अभिप्राय लिहा. तसेच प्रकल्प पर्ण करताना मिळालेल्या स्वानंदाचा उल्लेख एक-दोन वाक्यांत करा.
शालेय प्रकल्पांसाठी यादी
1. माहिती संकलन
थोर संत, थोर समाजसुधारक, थोर राष्ट्रपुरूष, थोर शास्त्रज्ञ, थोर खेळाडू, थोर समाजसेवक, थोर समाजसेविका इत्यादी.
2. संग्रह
म्हणीसंग्रह, वाक्प्रचार संग्रह, अभंगसंग्रह, श्लोक संग्रह, सुविचार संग्रह, कवितासंग्रह, भावगीत संग्रह, पोवाडा संग्रह, समरगीत संग्रह, देशभक्तीपर गीत संग्रह, पशु-पक्षी यांच्या चित्रांचा संग्रह, शंख-शिंपले संग्रह, तिकिटे संग्रह, जुनी नाणी संग्रह इत्यादी.
3. प्रदर्शन
चित्रकलाकृती प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन, पुस्तके प्रदर्शन, विज्ञानप्रकल्प प्रदर्शन, विविध प्रकारच्या खेळण्यांचे प्रदर्शन इत्यादी.
4. तक्ते
शालेय शैक्षणिक विषयातील विविध घटकांचे तक्ते इत्यादी.5. आदर्श
आदर्श बालक-बालिका, आदर्श विद्यार्थी-विद्यार्थिनी, आदर्श शिक्षक-शिक्षिका, आदर्श शाळा, आदर्श समाजसेवक-समाजसेविका, आदर्श महिला, आदर्श गाव, आदर्श शहर, आदर्श राष्ट्र इत्यादी.
(Source Whats app /Internet)

Back to zp school स्‍वताचे Youtube चॅनेल सुरू करत आहे.
subscribe करण्‍यासाठी.....Click Here
subscribe कसे करायचे......download video (2mb)

२५० च्‍या वर प्रकल्‍प Video नक्‍की पाहुया.
वरील सर्व माहिती डाउनलोड करूया.यात वर्गवार प्रकल्‍प यादी आहे.




४ टिप्पण्या:

  1. सर नमस्ते,
    ऑनलाईन निकाल पाहिला . खूप आवडला. मलाही माझ्या शाळेचा निकाल जर असाच ऑनलाईन करायचाय ... जमेल का ?
    तुमचे मार्गदर्शन हवे आहे.
    श्री. बाळू माणिकराव काटे
    थोरली विहीर ता. दौंड जि.पुणे
    9527811329
    Thank you

    उत्तर द्याहटवा
  2. सरजी , विस्तृत व उपयुक्त माहिती

    उत्तर द्याहटवा

Copyright © Back to ZP School | Powered by Blogger
Design by S L Khandagale | Blogger Theme by slkhandagale.blogspot.in