शिक्षणक्षेत्रातील एक तंत्रज्ञानविषयक पाउल.....................

गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

जिल्‍हा परीषद शाळेचा निकाल आता ऑनलाईन


First Zp School Online Result In MAHARASHTRA
सन २०१८-२०१९ या वर्षापासून जिल्‍हा परीषद प्राथमिक शाळा मुर्ती केंद्र सावळदबारा,ता.सोयगाव,जिल्‍हा औरंगाबाद ही शाळा ONLINE RESULT  सादर करीत आहे.

१. रोलनंबर 08 अक्षरी आहे.प्रत्‍येक रोलनंबरची सुरूवात 1819 या 4 अंकांने होते.
२.त्‍यानंतरचे दोन अंक वर्गाचे आहे.
   उदा.01,02,03,04,05,06,07
३. त्‍यानंतर दुसरे दोन अंक शाळेतील हजेरीतील अनुक्रमांक आहे.
    उदा.01,02.......11,12......23,24...26
४.आपणास याप्रमाणे रोलनंबर टाकावे लागतील.
  वर्ग 1 असेल तर   18190101  ते  18190117 पर्यंत
  वर्ग 2 असेल तर  18190201  ते  18190226 पर्यंत
  वर्ग 3 असेल तर  18190301 ते   18190322  पर्यंत
  वर्ग 4 असेल तर  18190401...ते...18190423  पर्यंत
  वर्ग 5 असेल तर  18190501...ते...18190520   पर्यंत
  वर्ग 6 असेल तर  18190601...ते...18190617    पर्यंत
  वर्ग 7 असेल तर  18190701....ते..18190714 पर्यंत
 वर्ग 8 असेल तर  18190801....ते..18190809 पर्यंत
५.ऑनलाईन निकाल आणि शालेय स्‍तरावरील निकाल यात तफावत असेल तर शालेय स्‍तरावरील निकाल अंतिम समजण्‍यात येईल.
६. रोलनंबर मराठी भाषेत टाकू नये.


विदयार्थी त्‍यांचा Result 1 मे 2019 रोजी पाहु शकतात.खालील  बटणावर  Click  करूया.


Online निकालाचा डेमो Youtube वर.......Click Here

Share:

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०१६

वाचन प्रेरणा दिन


पूर्व राष्‍ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्‍दुल कलाम हे नेहमी भारतातील प्रत्‍येक व्‍यक्‍ती स्‍वतःचा सकारात्‍मक विचार वापरून कसे स्‍वतःला बदलेल आणि त्‍याने भाारत देेश कसा शक्‍तीशाली होईल याचे विचार करत रहायचे.महाराष्‍ट्र शासनाने १५ आॅॅक्‍टोबर हा त्‍यांचा ज्‍नमदिन वाचन प्रेरणा दिन म्‍हणून साजरा करण्‍याचे ठरविले आहे.वैज्ञानिक असताना त्‍यांनी इंडिया २०२० हे पुस्‍तक लिहिले.या पुस्‍तकात त्‍यांनी तंत्रज्ञाानाचा वापर करून २०२० पर्यंत  भारत देश कसा समृध्‍द राष्‍ट्रामध्‍ये रूपांतरीत होईल याचे व्हिजन  लोकांसमोर ठेवले.चला  तर मग आपण सर्व त्‍यात सहभागी होवूया.


विवरणडाउनलोड करूया
Wings of Fire अग्निपंखdownload
वाचन प्रेरणा दिन GRdownload
वाचन प्रेरणा दिन GR13/10/2017
वाचन प्रेरणा दिन GRसंचनालय
वाचन प्रेरणा दिन लोगोdownload
उपक्रम सुचीdownload
पुस्‍तकांचं गावभिलार 
भरपूर भाषणेdownload
सोयगाव परीपत्रकdownload
दिवभाषिक पुस्‍तकेdownload
भाषणdownload
जीवनपरीचयdownload
जीवनपरीचयWikipedia
मोबाईलवर पुस्‍तके खजिनाचला पाहुया मराठीत
Share:

शनिवार, १३ ऑगस्ट, २०१६

Happy Independance Day

 आपणां सर्वांना
Happy Independance Day

आपणां सर्वांना स्‍वातंत्र्यदिनाच्‍या हार्दिक शुभेच्‍छा.
चला आपण सर्व हा सण अत्‍यंत उत्‍साहात साजरा करूया.त्‍यासाठी भारताचे संविधान काय आहे ? ध्‍वज संहिता म्‍हणजे काय ? ध्‍वज कसा बांधावा या सर्व गोष्‍टी आपणास माहिती हव्‍यात.


          शाळेतील मुलांना काही नमुनादाखल भाषणे देवूया.तसेच देशभक्‍तीपर हिंदी मराठी गीते आनंदाने गावूया.राष्‍ट्रगीताचा भरपुर सराव घेवूया.सुत्रसंचालन समजावून घेवूया.

चला तर मग  इथे क्लिक करूया
Share:

सोमवार, ४ एप्रिल, २०१६

रचनावाद काय आहे ?

रचनावाद काय आहे ?

रचनावाद म्‍हणजे विदयार्थी कसा शिकतो ? याच्‍या निरीक्षण आणि शास्‍त्रीय अभ्‍यासावर आधारीत सिध्‍दांत होय.रचनावादानुसार मनुष्‍य हा स्‍वताचे आकलन आणि जगाविषयीचे ज्ञान हे वस्‍तूच्‍या अनुभवातून व त्‍यांच्‍या प्रतिसादातून निर्माण करत असतो. ज्‍या ज्‍या वेळी आपण नवीन ज्ञान अथवा माहितीचे ग्रहण करतो तेव्‍हा ते ज्ञान अथवा माहिती आपण आपल्‍या पुर्वीच्‍या संकल्‍पना आणि अनुभवाशी जोडत असतो.यासाठी आपण प्रश्‍न विचारावे लागतात,माहितीचा कसून शोध घ्‍यावा लागतो.आणि मिळालेल्‍या माहितीवरून आपणास काय ज्ञात आहे हे ठरवावे लागते.
वर्गामध्‍ये रचनावादी अध्‍ययनाच्‍या दृष्‍टीने विविध प्रकारचे अध्‍ययन अनुभव महत्‍वाचे असतात.शिक्षकांनी विदयार्थ्‍यांना सतत कृतिशील ठेवणे गरजेचे आहे.शिक्षकांनी विदयार्थ्‍यात अस्त्त्विात असलेल्‍या संकल्‍पना लक्षत घेवून त्‍याप्रमाणे विदयार्थ्‍यांना त्‍यासंबधित कृती करायला प्रेरीत करून त्‍यांच्‍या ज्ञानाची रचना करायला मदत करावी.
रचनावादी शिक्षक हे विदयार्थ्‍यांना आकलनासाठी कृती कषा सहायक ठरतात याचे सातत्‍याने महत्‍व समजून घेण्‍यासाठी विदयार्थ्‍यांना प्ररीत करत असतात.त्‍यांना स्‍वताला प्रश्‍न विचारून आणि मिळालेल्‍या माहितीची रचना करून रचनावादी वर्गातील विदयार्थी हा एक तरबेज अध्‍ययनार्थी (Perfect Learner) बनतो.
विदयार्थ्‍यांना प्राप्‍त अनुभवांच्‍या प्रक्रियेतून ते गुंतागुंतीतून माहिती कशी प्राप्‍त करायची हे शिकतात.आणि नवीन ज्ञान संकलित करण्‍याच्‍या क्षमता प्राप्‍त करतात.म्‍हणून विदयार्थ्‍यांना अध्‍ययनासाठी प्रवृत्‍त अथवा प्रेरीत करत राहणे ही शिक्षकाची महत्‍वाची भूमिका राहते.
उदा.

विदयार्थ्‍याचा गट विज्ञानातील एका समस्‍येवर चर्चा करत आहे.तरी शिक्षकाला समस्‍येचे उत्‍तर माहिती असले तरी शिक्षक त्‍या विदयार्थ्‍यांना उपयुक्‍त दिशांनी विचार करायला प्रवृत्‍त करणारे प्रश्‍न पुन्‍हा पुन्‍हा विचारतील.शिक्षक विदयार्थ्‍यांना स्‍वतकडील उपलब्‍ध ज्ञान अथवा माहिती आणि नवीन प्रयत्‍नांमधून प्राप्‍त  माहितीवर लक्ष देवून त्‍याची चिकित्‍सा करायला सांगतील.त्‍यावेळी समस्‍येची सोडवणूक करण्‍यासाठी एखादया विदयार्थ्‍याला योग्‍य दिशा प्राप्‍त झाली अथवा योग्‍य माहिती मिळाली तर शिक्षक विदयार्थी गटाचे लक्ष त्‍या माहितीकडे वेधून घेवून समस्‍येचे उत्‍तर प्राप्‍त करण्‍यासठी प्रेरीत करतील.विदयार्थ्‍ी गट त्‍याप्रमाणे नियोजन,कृती व प्रयोग यातून ज्ञानाची प्राप्‍ती करेल.यानंतर शिक्षक शिक्षक आणि विदयार्थी आपण काय आणि कसे शिकलो यावर चर्चा करतील.त्‍यावेळी निरीक्षण आणि प्रयोग त्‍यांना नवीन माहिती प्राप्‍त होण्‍यासाठी कसे उपयोगी पडले यावर चर्चा करतील.
पारंपारीक पध्‍दतीने अध्‍ययन करणारे या पध्‍दतीला विरोध करतात अथवा टिका करतात,की या पध्‍दतीमध्‍ये शिक्षकाचा सक्रिय भाग असत नाही.तथापि ज्ञानरचनावादाने शिक्षकाची भूमिका बदलली आहे.जेणेकरून शिक्षक विदयार्थ्‍यांना आपले ज्ञान देण्‍यापेक्षा ज्ञानाची रचना करायला मदत करतात.सुविधा पुरवितात.रचनावादी शिक्षक विदयार्थ्‍याना समस्‍या निराकरण आणि प्रश्‍न कौशल्‍यावर आधारीत अध्‍ययन कृती याद्वारे विदयार्थी स्‍वताच्‍या कल्‍पना,अनुमान काढून सह अध्‍ययनार्थीच्‍या मदतीने शिकण्‍याची साधने उपलब्‍ध करून देत असतात.रचनावाद हा विदयार्थ्‍यांना निष्क्रिय माहिती ग्रहण करणारा न बनवता सक्रीय सहभागी बनवत आहे.पाठयपुस्‍तक अथवा शिक्षकांकडून यांत्रिक पध्‍दतीने ज्ञान प्राप्‍त करण्‍यापेक्षा शिक्षकांच्‍रूा मार्गदर्शनाने विदयार्थी स्‍वता ज्ञानाची रचना करतो.
ज्ञानरचनावाद हा विदयार्थ्‍यांना शिक्षकांनी ज्ञानाने भरावयाचे रिकामे भांडे ,आकार इयावयाचा मातीचा गोळा अथवा शिक्षकांनी गिरवायची कोरी पाटी समजत नाही.रचनावादी सिध्‍दांतानुसार विदयार्थ्‍यांना स्‍वताच्‍या अध्‍ययन प्रक्रीयेमध्‍ये सक्रीय सहभागी करून घेतले आहे.शिक्षक हा सुविधादाता (Fasililator) आहे.जो मार्गदर्शन करतो,तात्‍काळ प्रेरणा देतो,आणि विदयार्थ्‍यांना स्‍वताची आकलनशक्‍ती विकसित करण्‍यासठी मदत करतो.म्‍हणुन उपयुक्‍त प्रश्‍न  विचारणे हे शिक्षकांचे मोठे आणि महत्‍वाचे काम या पध्‍दतीत आहे.
वर्तनवादाच्‍या पारंपारीक विचारांपेक्षा वेगळा विचार देणारा रचनावाद आहे.वर्तनवादामध्‍ये शिक्षक अध्‍यापन करतो मात्र सर्वच विदयार्थी 100 टक्‍क्‍े अध्‍ययन करतातच असे नाही.तथापि ज्ञानरचनावादामध्‍ये शिक्षक सुविधा पुरवितात,अध्‍ययन अनुभव निर्माण करतात आणि विदयार्थी पुर्णपणे अध्‍ययन करतात.यासाठी ज्ञानरचनावाद हि फार महत्‍वाची संकल्‍पना ,दृष्‍टीकोन आहे.
                   (लेखन श्री. खंदारे रविंद्र शिक्षण विस्‍तार अधिकारी,जिल्‍हा परीषद सातारा) 
Share:

रविवार, ३ एप्रिल, २०१६

याचा विचारच केला नव्हता .......


            इयत्‍ता पहिलीत मुले दाखल होणार आहेत.त्‍यांना आपल्‍याला मुळाक्षरे शिकवायची आहेत.त्‍यासाठी आपल्‍याला ज्ञानरचनावादी पध्‍दतीचा थोडा अभ्‍यास करावा लागेल.कृतीयुक्‍त अध्‍यापनामुळे भरपूर फायदा होणार आहे.पाठांतर केलेले मुल हळुहळु विसरत चालते,जर त्‍याचा सातत्‍याने सराव झाला नाही तर.उदा.आपण जर पाहीले की एखादा विदयार्थी आपण इंग्रजी माध्‍यमाच्‍या शाळेत टाकला तर सुरूवातीला तो कोणतीही गोष्‍ट एकदम चाणक्षपणे सांगत असतो.पण कालांतराने आई वडीलच सांगतात की,हा एवढा हुशार होता ना.......................
चला पहिलीची पुर्वतयारी पहीली पाहूया.
मुलांच्‍या बोटांनांही व्‍यायाम दयावा लागेल.शाळेत आल्‍याआल्‍या जर त्‍याला Direct पाटीवर अ,आ...................नको घ्‍यायला.ज्ञानरचनावाद सांगतो की बोटांना सुध्‍दा व्‍यायाम जर दिला तर बोंटांमध्‍ये सुसूत्रता येते.
मुलांना करायला लावूया.....
हया एवढया वस्‍तू डब्‍यात भर.
चिंचोक 3 बोटांनी वेचून आण.
2 बोटांनी खडे उचल.
2 बोटांनी मणी रांगेत लाव.
हाताच्‍या अंगठयाने पायाच्‍या इतर बोटांना स्‍पर्श कर.
3 दोरींच्‍या वेणी घालणे.
वरील सर्व गोष्‍टी केल्‍याने पेन्सिल व्‍यवस्थित धरून ती हवी तशी गिरवता येते आणि मुलांची अक्षरे कमालीची सुधरतात.ही गोष्‍ट कुमठे बीटस्‍तरावर ( श्री.अनिल नामदेव जाधव उपशिक्षक जि.प.प्राथ.शाळा बावधन ने.3)राबवलेली आहे.

ज्ञानरचनावादावर विश्‍वास ठेवून व त्‍याची काटेकोर अंमलबजावणी केल्‍यास आणि पारंपारीकतेला फाटा देवून नविनतेचा स्विकार आपण तर केला तर यश १०० टक्‍के आपल्‍याला मिळेलच.


Share:

Copyright © Back to ZP School | Powered by Blogger
Design by S L Khandagale | Blogger Theme by slkhandagale.blogspot.in