गणनपूर्व तयारी
टप्पा 1 – तुलना
उपक्रम 1 –परीसरातील सहल/भेट
परीसरातील विविध ठिकाणांना भेट देवून घेतलेल्या माहितीवर
लहान-मोठा,उंच-बुटका,आबुटका,आधी-नंतर,दूर-जवळ,कमी-जास्त,कितीने
कमी-कितीने जास्त,जड-हलका,जाड-पातळ इ.तुलनात्मक
प्रश्नांवर चर्चा करावी.विदयार्थ्याना प्रत्यक्ष अनुभव दयावेत.(विदयार्थ्यांकडून
वाचनाची अपेक्षा नाही) फळयावर चित्रालेख किंवा स्तंभालेख काढून विदयार्थ्याकडून वस्तुच्या
संख्येएवढे ठोकळे रंगवून घ्यावेत.
उदा.
1) प्रथम कोणते झाड पाहीले ?
2) उंच/मोठे झाड कोणते ?
3) बुटके /लहान झाड कोणते ?
4) रंगविलेल्या ठोकळयावरून कमी-जास्त,कितीने जास्त-कितीने कमी असे प्रश्न विचारावेत.
या पध्दतीने ठोकळे/स्तंभ काढून पाहिलेल्या वस्तूंएवढे ठोकळे रंगविणे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा