रचनावाद काय आहे ?
रचनावाद म्हणजे विदयार्थी कसा शिकतो ?
याच्या निरीक्षण आणि शास्त्रीय अभ्यासावर आधारीत सिध्दांत होय.रचनावादानुसार
मनुष्य हा स्वताचे आकलन आणि जगाविषयीचे ज्ञान हे वस्तूच्या अनुभवातून व त्यांच्या
प्रतिसादातून निर्माण करत असतो. ज्या ज्या वेळी आपण नवीन ज्ञान अथवा माहितीचे
ग्रहण करतो तेव्हा ते ज्ञान अथवा माहिती आपण आपल्या पुर्वीच्या संकल्पना आणि
अनुभवाशी जोडत असतो.यासाठी आपण प्रश्न विचारावे लागतात,माहितीचा कसून शोध घ्यावा
लागतो.आणि मिळालेल्या माहितीवरून आपणास काय ज्ञात आहे हे ठरवावे लागते.
वर्गामध्ये रचनावादी अध्ययनाच्या दृष्टीने
विविध प्रकारचे अध्ययन अनुभव महत्वाचे असतात.शिक्षकांनी विदयार्थ्यांना सतत
कृतिशील ठेवणे गरजेचे आहे.शिक्षकांनी विदयार्थ्यात अस्त्त्विात असलेल्या संकल्पना
लक्षत घेवून त्याप्रमाणे विदयार्थ्यांना त्यासंबधित कृती करायला प्रेरीत करून
त्यांच्या ज्ञानाची रचना करायला मदत करावी.
रचनावादी शिक्षक हे विदयार्थ्यांना आकलनासाठी
कृती कषा सहायक ठरतात याचे सातत्याने महत्व समजून घेण्यासाठी विदयार्थ्यांना
प्ररीत करत असतात.त्यांना स्वताला प्रश्न विचारून आणि मिळालेल्या माहितीची
रचना करून रचनावादी वर्गातील विदयार्थी हा एक तरबेज अध्ययनार्थी (Perfect
Learner) बनतो.
विदयार्थ्यांना प्राप्त अनुभवांच्या प्रक्रियेतून
ते गुंतागुंतीतून माहिती कशी प्राप्त करायची हे शिकतात.आणि नवीन ज्ञान संकलित
करण्याच्या क्षमता प्राप्त करतात.म्हणून विदयार्थ्यांना अध्ययनासाठी प्रवृत्त
अथवा प्रेरीत करत राहणे ही शिक्षकाची महत्वाची भूमिका राहते.
उदा.
पारंपारीक पध्दतीने अध्ययन करणारे या पध्दतीला
विरोध करतात अथवा टिका करतात,की या पध्दतीमध्ये शिक्षकाचा सक्रिय भाग असत नाही.तथापि
ज्ञानरचनावादाने शिक्षकाची भूमिका बदलली आहे.जेणेकरून शिक्षक विदयार्थ्यांना आपले
ज्ञान देण्यापेक्षा ज्ञानाची रचना करायला मदत करतात.सुविधा पुरवितात.रचनावादी
शिक्षक विदयार्थ्याना समस्या निराकरण आणि प्रश्न कौशल्यावर आधारीत अध्ययन
कृती याद्वारे विदयार्थी स्वताच्या कल्पना,अनुमान काढून सह अध्ययनार्थीच्या मदतीने
शिकण्याची साधने उपलब्ध करून देत असतात.रचनावाद हा विदयार्थ्यांना निष्क्रिय
माहिती ग्रहण करणारा न बनवता सक्रीय सहभागी बनवत आहे.पाठयपुस्तक अथवा
शिक्षकांकडून यांत्रिक पध्दतीने ज्ञान प्राप्त करण्यापेक्षा शिक्षकांच्रूा
मार्गदर्शनाने विदयार्थी स्वता ज्ञानाची रचना करतो.
ज्ञानरचनावाद हा विदयार्थ्यांना शिक्षकांनी
ज्ञानाने भरावयाचे रिकामे भांडे ,आकार इयावयाचा मातीचा गोळा अथवा शिक्षकांनी गिरवायची
कोरी पाटी समजत नाही.रचनावादी सिध्दांतानुसार विदयार्थ्यांना स्वताच्या अध्ययन
प्रक्रीयेमध्ये सक्रीय सहभागी करून घेतले आहे.शिक्षक हा सुविधादाता (Fasililator)
आहे.जो मार्गदर्शन करतो,तात्काळ प्रेरणा देतो,आणि विदयार्थ्यांना स्वताची
आकलनशक्ती विकसित करण्यासठी मदत करतो.म्हणुन उपयुक्त प्रश्न विचारणे हे शिक्षकांचे मोठे आणि महत्वाचे काम
या पध्दतीत आहे.
वर्तनवादाच्या पारंपारीक विचारांपेक्षा वेगळा
विचार देणारा रचनावाद आहे.वर्तनवादामध्ये शिक्षक अध्यापन करतो मात्र सर्वच विदयार्थी
100 टक्क्े अध्ययन करतातच असे नाही.तथापि ज्ञानरचनावादामध्ये शिक्षक सुविधा
पुरवितात,अध्ययन अनुभव निर्माण करतात आणि विदयार्थी पुर्णपणे अध्ययन
करतात.यासाठी ज्ञानरचनावाद हि फार महत्वाची संकल्पना ,दृष्टीकोन आहे.
(लेखन
श्री. खंदारे रविंद्र शिक्षण विस्तार अधिकारी,जिल्हा परीषद सातारा)